दिल्ल्लीकडूनही सन्मान


दिल्ली येथील Google Educator Group यांनी महाराष्ट्रातील निवडक ३० शिक्षकांची कार्यशाळा घेवून जिल्हा परिषेदेच्या शिक्षकांनी  Online Test   साठी   साईट बनवून शैक्षणिक क्षेत्रात भर टाकली म्हणून सर्व जिल्हा परिषद शिक्षकांचे विशेष कौतुक केले व  crcmhaswad  या साईट बद्दल विशेष कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या हे सर्व घडले आपणा सर्वांचा पाठींबा असल्याने, सहकार्य असल्याने  संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचा हा दिल्लीवासीयांनी केलेला हा सन्मान आहे.
                                       Google Educator Group  चे सपोर्टर नेभी अब्रहम व संदीप कौर यांनी विशेष कौतुक केले व संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनीही कौतुकाची थाप टाकली हे सर्व  तुंम्हा सर्वामुळे घडले  मला अशीच तुमची साठ, सहकार्य व मार्गदर्शन हवे आहे .सर्व महाराष्ट्रातील माझ्या शिक्षक बांधवांच्या या कार्याची दखल दिल्लीलाही घ्यावे लागते ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. बस असेच एकमेकांच्या सहकार्यांने , मार्गदर्शनाने खूप दुराचा पल्ला आपण सर्वांना गाठायचा आहे.
                                   आणखी एक कल्पना माझ्या डोक्यात आहे कि संपूर्ण महाराष्ट्रातील संगणक याबाबतीत उत्तम काम कारण-या  शिक्षकांना एकत्रीत आणून यापेक्षाही विधायक कार्य करता येईल असे वाटते मात्र ते सर्वांवर अवलंबून आहे मी  आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय. असेच सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा , सहकार्य करावे ही सदिच्छा ठेऊन मी आजच्या पुरता थांबतो  कारण बाकी बरीच कामे आहेत ब्लाग्ची 
                                                                                                                                                                                           धन्यवाद