संगणक कार्यशाळा यशस्वी दि.१८/०१/२०१५ रविवार शिक्षक भवन पुणे येथे संपूर्ण महाराष्ट्रातून निवडक १०० लोकांना संगणक कार्यशाळेसाठी बोलावले तरीसुद्धा जवळपास १५० शिक्षक स्वयं स्फूर्तीने ५०० किमी पेक्षा जास्त अंतरावरून आले व दिवसभर कार्यशाळा अतिशय उत्तम पार पडली हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडले . कार्यशाळेसाठी ज्ञानप्रबोधिनी चे प्रशांत सर आणि MKCL चे उदय सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले सर्वांचे खूप आभार . भरपूर जिल्ह्यातून तिकडे कार्यशाळा आयोजित करण्यासाठी फोन व इमेल्स येत आहेत लवकरच सगळीकडे कार्यशाळा घेवून प्राथमिक शिक्षणात आणि प्रशासनात एक सुलभता व सहजता आणण्याचा प्रयत्नच नाही तर यशही मिळवूया त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपल्या प्रतीक्रेयेच्या प्रतीक्षेत ......

काही प्रतिक्रिया
नमस्कार

काल जी hightech मेजवानी तुम्ही आम्हास दिली त्याबद्दल राम सर व बालाजी सर आपल्या दोघांचा मी शतशः आभारी आहे 

कालच्या कार्यशाळेला अकोले (अहमदनगर ) मधील माझ्यासह १५ जन हजर होते. 

तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा आम्ही पूर्ण वापर करण्याची ग्वाही देत आहोत 

माझ्या तालुक्यात अशीच एक संगणक  कार्यशाळा आयोजित करण्याची आमची इच्छा आहे. 

तरी आपला होकार / नकार कळवावा . 

पुनश्च एकदा धन्यवाद 

प्रतिक नेटके 
अकोले अहमदनगर 
९३७२८८८०६९
आपल्या धडपडीला माझा सलाम......!
 आपण करत असलेल्या कार्यामुळे शिक्षकांचा पर्यायाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होत आहे. आपल्याकडून अनेक तरुण शिक्षक प्रेरणा घेत आहेत.

आपण करत असलेल्या कार्यास माझ्याकडून मनापासून शुभेच्छा .
                                                                                                   प्रशांत खराडे चंद्रपूर 

आज पुण्यात शिक्षक भवन येथे "मराठी शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून नवचैतन्य निर्माण करणाऱ्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय संगणक कार्यशाळेचे"आयोजन मान.बालाजी जाधव सर व त्यांचे मित्र राम सालगुडे सर यांच्या उत्कृष्ठ मार्गदर्शनात पार पडले.
कार्यशाळा खरच उत्कृष्ठ होती .त्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या .एवढेच नाही तर राज्यभरातून आलेल्या मित्रांची नव्याने ओळख झाली . माझ्याकडे कदाचित यावेळी लैपटॉप असता तर बरेच प्रात्यक्षिक करुन बघता आले असते .तरीही या कार्यशाळेत ब्लॉग कसा बनवायचा? u tube वीडियोचा अध्यापनात कसा वापर करायचा ? वीडियो uploding , downloading तसेच शैक्षणिक वीडियो कैसे तैयार करायचे ? गूगल डॉक्स , गूगल अर्थ ,फोटोशॉप इत्यादि विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन आयोजकांकडून करण्यात आले .त्याचप्रमाणे शैक्षणिक कार्यासाठी उपयोगी पडतील असे काहीapps तथा सॉफ्टवेयर सर्वांना देण्यात आले त्यांचा बराच वापर शैक्षणिक कार्य करताना होईल यात शंकाच नाही .
या सर्व आयोजनाबद्दल जाधव सर व सालगुडे सरांचे अभिनंदन व आभार . महाराष्ट्रातील तमाम शिक्षक वर्गांना अशाच तंत्रज्ञान विषयक लाभ होईल यविषयीच्या कार्यशाळा त्यांनी आयोजित कराव्यात अशी त्यांच्याकडून अपेक्षा.

 सुधीर मोहरकर ,चंद्रपूर

 
सर आजची कार्यशाला खुप उत्कृष्ट प्रकारे पार् पडली...

Regards,
suresh khaire | Sureshkhaire8558@gmail.com

पुणे येथे आपण घेतलेल्या संगणक कार्यशाळेस उपस्थित होतो तुम्ही घेतलेली कार्यशाळा ही महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवून आणू शकणारी खूपच उपयुक्त अशी कार्यशाळा होती. धन्यवाद‌‍ ! बालाजी सर आणि राम सर on शिक्षकांसाठी संगणक कार्यशाळा

Bhum Usmanabad

सर
     आपण घेतलेल्या कार्यशाळेमुळे मी हा email तुम्हाला मराठीमधून पाठवत
आहे. मी email पाठवायचा तर इंग्लिश मध्ये type करून पाठवत असे पण आता
मराठीमधून email पाठवण अगदी सोपे झाले आहे.
     सर बऱ्याच शिक्षकांनी कुटुंब सर्वेक्षण software ची मागणी माझ्याकडे
सुद्दा केली आहे. तरी सर कृपया मी तुम्हाला software पुन्हा पाठवत आहे .
तरी कृपया ते dawnlode करुन तुमच्या blog वर टाकावी . हि नम्र विनंती.
पंकज रासकर खंडाला ,सातारा .

आदरणीय सर
     सादर प्रणाम 
सर आपण दी.18/01/2015 रोजी पुणे या ठिकाणी जी कार्यशाळा घेऊन आम्हा शिक्षकांस जे योग्य व अचूक असे मार्गदर्शन केले या बद्दल आभारी आहे.आपण जे या कार्यात वाहून घेतले आहे ते काम किती कठीण आहे हे मी जाणतो.कार्यशाळा अशा स्वरुपात nominal फी घेऊन प्रत्येक वर्षी व्हावी. 
  कळावे आपला  
                                                                          श्री.नवले  चंद्रकांत कुंडलिक
                                                                 जि.प.शाळा कोथाळे त.मोहोळ जि.सोलापूर 
                                                                 Mob.9623932440   


सर,
      कार्यशाळे नंतरचा आपला ईमेल वाचला. कार्यशाळा खुपच उपयुक्त होती. एवढ्या कमी वळे मध्ये इतके ज्ञान मिळाले .
       मी सध्या माझ्या तालुकयातिल   जास्तीत जास्त शिक्षकांना या कार्यशाळे बद्दल सांगितले आहे.तसेच आपल्या बलाॅग बद्दल माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी यांच्या शी बोलणे झाले असून लवकरच आमच्या कडे अशीच एखादी कार्यशाळा व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. 

श्री. एकनाथ मंजाबापू गायकवाड 
पं.स. राजापूर
जि.रत्नागिरी.
 
आदरणीय बालाजी सर व राम सर आपणास नमस्कार !
आपण दि.१८.०१.१५ रोजी अतिशय कमी खर्चात आयोजित केलेल्या पुणे येथील संगणक कार्यशाळेस मी उपस्थित होतो. आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. आपण सांगितलेल्या गुगल इनपुट टूल च्या सहाय्याने सदरील मेल टाईप केला आहे.खरोखरच आपण इतक्या दुर्गम भागात काम करत असून तंत्रज्ञानाची ज्योत पेटवण्याचे काम करत आहात ते अतुलनीय आहे. आपण दिलेल्या विविध सोफ्टवेअर बद्दलची माहिती खूपच उपयुक्त आहे.
आपणापासून प्रेरणा घेऊन मी सुद्धा हे कार्य करण्यास प्रेरित झालो आहे. तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करून आपले अध्यापन दर्जेदार करण्याचा मी प्रयत्न करत आहे. यापुढेही आपण नक्कीच अपडेट राहू.
मी माझा ब्लोग तयार केला आहे. zppskarkatta.blogspot.in परंतु मला आणखी व्यवस्थित पोस्टस टाकता आल्या नाहीत. प्रयत्न करत आहे. अडचण आल्यास आपणास विचारेन. कृपया आपण मदत करावी. आपणास पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद !

आपला मित्र,
श्री वायाळ श्रीहरी साहेबराव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करकट्टा
ता. जि. लातूर मो. ९४२३३९८८४६.

18 जानेवारीला तुम्‍ही आम्हाला जे मार्गदर्शन केलं  महाराष्ट्रामधील प्रत्येक शाळेतला शिक्षक संगणक साक्षर झाला पाहिजेत. नक्कीच हाोईल सर.... धन्यवाद सर एक अफलातून  संगणक प्रशिक्षण दिल्या बदल.......
हायटेक टिचर प्रणाली च्या विचाराबद्दल हार्दिक शुभेच्छा जाधव सर व सालगुडे सर........

संदीप टाकळकर
9960342443
औरंगाबाद.
सहशिक्षक

Regards,
संदीप टाकळकर | katharsandeep7@gmail.com

 
 

No comments: