Home Schooling
होम स्कुलिंग

                        इयत्ता ५ वीत शिकणारी माझी मुलगी भक्ती हिने करोना च्या काळातील 80 दिवसात आपल्या पालकांच्या मदतीने कोणत्याही बंधना शिवाय  स्वत: ला आनंद मिळावा म्हणून काही गोष्टी केल्या आणि आज त्याचा सहजच आढावा घेतला तर चक्क नवल वाटावे इतके काही तिने या सुट्टीच्या काळातही केले हे पाहून मुले घरी जरी असले म्हणजेच शाळेत न जाता सुद्धा  शिक्षण बंद नसते कारण फक्त पुस्तक शिकणे म्हणजेच शिक्षण नसून खूप सारं अनुभवातून,प्रात्यक्षिकातून सक्ती शिवाय ,मुलांच्या कलानुसार शिकता येते हे मला प्रत्यक्ष पालक म्हणून माझ्या घरातील अनुभवा तून दिसून येत आहे  याचं हे उत्तम उदाहरण आहे.

 १) वाचन, लेखन व रेकॉर्डिंग -   भक्तीला तिला स्वत:साठी एक tab आहे त्यामध्ये ‘मराठी गोष्टी’  नावाचे एक app आहे त्यात खूप सा -या गोष्टी आहेत त्या तिला वाटेल तेंव्हा ती वाचायची आणि दररोज संध्याकाळी तिची आई झोपताना एक गोष्ट सांगते ती गोष्ट भक्ती सकळी उठून तिच्या वहीत लिहते व आम्हाला दाखवून नंतर तिने त्यासाठी एक फाईल केली आहे त्यामध्ये ती एका पेपर वर लिहून जोडून ठेवेते.पुन्हा संध्याकाळी लहान भाऊ विघ्नेशला ती छानपणे सांगते,मी तिला रेकॉर्ड करण्याचा डेमो दिला आणि जवळपास ३० गोष्टी भक्तीने या सुट्टीत वाचून ऐकूण लिहल्या व रेकॉर्ड केल्या आहेत. घरी बसून तिला हे आवडीने करावेसे वाटले,आम्ही उभयतांनी यासाठी कोणतीही सक्ती केली नाही.

  
२) चित्रकला – तशी चित्रकला हि भक्तीच्या लहानपणापासून च आवडीचा विषय त्यात सुट्या म्हणटल्यास अधिक उत्तम संधी आणि त्या संधीचे सोने केले भक्तीने, युट्युब वर पाहून आणि घरात उपलब्ध असण-या विविध वर्तमानपत्रात पाहून, मासिके व इतर जे सापडेल त्यातून तिने ४०-५० सुंदर अशी चित्रे काढून रंग दिले आहेत हे काम ती विशेषतः दुपारी आमच्या झोपेच्या वेळेत करते.चित्र पूर्ण झाल्यावर अगदी प्रसन्न चेह-याने ती आम्हाला दाखवते व तिची आई तिला काही बदल सुचवते मी मात्र अगदी छान एवढच बोलतो,कारण ती आणखी पुढे उत्तम काढणार हा पालक म्हणून मला विश्वास आहे.
   
       
३) कागद्काम,पुठ्ठाकाम – यामध्ये राणीला म्हणजे माझी पत्नी हिला विशेष रस असल्याने त्या दोघी मिळून हे काम आवडीने करतात यामध्ये त्यांनी कागदापासून सुंदर अशा फुलदाणी, पेन stand , फुलांचे गुच्छ, फुलांचे हार, फुलपाखरे,पर्स , चहाचे कप,पिशव्या, कापडी मास्क, पुठ्याचे घर,पाण्याच्या बाटली पासून फुलदाणी,झुंबर अशा जवळपास ३० वस्तू बनवून हॉल मध्ये मांडल्या आहेत. यासाठी युट्युब वरील व्हिडिओ ची व भक्तीच्या आईची मदत घेऊन तिने अगदी सहजपणे या बाबी केल्या त्या ही न कंटाळा करता व वाट्टेल त्या वेळी.
    

४) मातीकाम – आजकाल आपण मुलांना मातीपासून दूर करत आहोत मी मात्र गावाच्या बाहेर जाऊन २ पिशव्या काळी माती भक्तीला आणून दिली तिच्या मागणी वरून आणि मग पोर्च मध्ये भक्ती व विघ्नेश यांनी घरातील भांडे, बैल, गाडी, खुर्ची,खाट अशा २० हून अधिक मातीच्या सुंदर वस्तू बनवून आपली मातीशी असणारी नाळ टिकवली आहे त्यामध्ये भओमितिक आकार सुद्धा बनवले आहेत.व काहींना आता ती रंग देत आहे.
    
५) पाककला – सुट्टीत आईच्या मदतीने मी काम शिकणार असे तिने जानेवारी तच ठरवले होते आणि मार्च मध्ये करोना मुळे तिला संधी भेटली व तिने आईसोबत चहा करणे , भाज्या निवडणे, भात करणे, gas चालू बंद करणे, चपाती साठी पीठ मळणे ,पोळ्या लाटणे इतपर्यत शिकून घराची स्वच्छता करणे, छोटी छोटी कपडे धुणे या सर्व बाबी ती आवडीने करत आहे हे महत्त्वाचे आहे.स्वंयापक घरात स्वच्छता, भांडे धुणे इत्यादी बाबी आवडीने करते.

                     
६) बागकाम – आमच्या  घरासमोर मोठा मोकळा भाग आहे तिथे खूप सारी झाडे आहेत फुलांची, फळांची, औषधी वनस्पती इत्यादी त्यांना पाणी देणे,माझ्यासोबत झाडांना माती लावणे अशा कामात  सुध्दा ती खाली खेळायला आल्यावर भाग घेते.झाडावर चढून आंबे काढणे,चिक्कू काढणे, जांभळे काढणे सुद्धा भक्तीने शिकले ,सुरुवातीला शिडीवरून मग सरावाने स्वत: शिकली.
 
७) खेळ- तिने या सुट्टीत मनसोक्त खेळांचा आनंद घेतल्याचे मी स्वत: पहिले कारण सकाळी माझ्या सोबत योगा करण्यापासून ते सायंकाळी छतावरील जॉगीग पर्यंत ती माझ्या सोबत असायची. तिने झिबल्या मनसोक्त खेळल्या, दोरी उड्या खेळल्या,आम्ही कधी कधी BADMINTAN खेळायचो त्यातही ती सहभागी व्हायची,सायकल तर तिने इतकी खेळली कारण जवळपास १५० फुट रिकामी जागा आमच्या घरासमोर मोकळी आहे त्यात तिला डबडबून घाम येईपर्यंत ती खेळायची हे मी स्वत: पहिले आहे व त्यातून तिला खूप खूप आनंद मिळतोय हे दिसायचे कारण दैनंदिन शाळा सुरु असतना असा वेळ मिळताच नाही.दुपारी कधी कधी साप शिडी , बुद्धिबळ यावर सुद्धा ती बसायची .


  
                या वरील सर्व बाबी तिला आम्ही करण्याची सक्ती केली नाही, कोणतेही वेळापत्रक दिले नाही लादले नाही फक्त घरी आपण नवनवीन शिकू शकतो करू शकतो हे सांगायचो व तिला ते आवडून ती हे सर्व करत आहे कारण यातील खूप कमी गोष्टी आपल्या दैनंदिन शाळेत शिकायला ,करायला मिळतात हे एक कारण असण्याची शक्यता आहे सोबतच इयत्ता ६ वीच्या गणित या पुस्तकातील काही भाग तिने सोडवला आहे.कधीही  कंटाळा जाणवला नाही, ती नाराज दिसत नव्हती सर्व काही आनंदाने करत आहे अजूनही खरोखर इच्छा तिथे मार्ग असतात हे जाणवायला लागले पालक म्हणून आवश्यक साहित्य मी माझ्या मुलीला देत गेलो आणि पाहता पाहता तिने वाचनाचा , लेखनाचा, चित्रकलेचा, कलेचा इत्यादी छंद अगदी सहजपणे ती शिकत गेली ,वाढवत गेली होम स्कुलीग घरी बसून सुद्धा याप्रमाणे व्हायला लागल्यास मुले स्वावलंबी होण्याकडे जाताना दिसत आहेत, स्वत:चा निर्णय क्षमता वृद्धिंगत होताना दिसून आली आणि कोणत्याही सक्ती व वेळापत्रकात न अडकता त्यांच्या मनाच्या कलानुसार केल्यास सुद्धा मुलाचे शिक्षण सातत्याने सुरु राहू शकते हे एक पालक म्हणून मला जाणवू लागले आहे ....
 
बालाजी जाधव प्राथमिक शिक्षक
 जि.प शाळा विजयनगर ता .माण जि सातारा.
मोबाईल नं -  ७५८८६११०१५  इमेल- crcmhaswadno3@gmail.com

No comments: