Zero Budget E Library

 


नाव- बालाजी बाबुराव जाधव ,उपशिक्षक. ७५८८६११०१५

 जि प प्राथमिक शाळा विजयनगर ता माण जि सातारा

 

१) नावोपक्रमाचे शीर्षक :-  झिरो बजेट लायब्ररी


ZERO BUDGET E LIBRARY

२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व :-

NEED AND IMPORTANCE

अ)       उपक्रम निवडण्यामागाचे कारण :- झिरो बजेट लायब्ररी हा  उपक्रम निवडण्यामागे सर्वात प्रमुख कारण आहे की एकाच उपक्रमातून सर्व कौशल्य उत्तम रित्या रुजवता  येतात.

If the students are given exposure to the various aspects of life in their tender age, they grasp the knowledge effectively. It’s necessary to develop language skills. In a drought prone area where I  teach the students do not have any access to the sophisticated gadgets. The government school, where I teach is meant for the underprivileged section of the society. The students can not buy books.  The innovative idea of ‘Zero Budget School’ works well. It expands the sphere of experience of the students and enrich their colorful life.

          ब) उपक्रमाचे वेगळेपण :- कुठलाही खर्च न करता विद्यार्थी या उपक्रमातून उत्तम वाचन करायला शिकतात, वाचलेले उत्तमपणे बोलायला म्हणजेच अभिव्यक्त होण्यास शिकतात ,वाचलेले वा बोललेले  स्वता:च्या भाषेत लिहायला शिकतात,लिहलेले  स्वता:रेकॉर्ड करायला शिकतात. व तंत्रज्ञानाच्या मदतीने ती झिरो बजेट लायब्ररीलाखो शिक्षक व शाळांना उपयुक्त होते.  असे करून आपल्या वर्गाची, शाळेची एक सर्वोत्तम अशी झिरो बजेट लायब्ररीतयार होण्यास मदत होते.

As appropriately said the Zero budget library enhances students’ LSRW (Learning,Speaking,Reading and Writing)skills. Through this initiative the students not only learn to record their performance but also create a digital library which can be accessed by  multiple  schools and teachers.

क)    उपयुक्तता :-  झिरो बजेट लायब्ररी मुळे आपल्या शाळेतील एक वर्ग, सर्व वर्ग तर याचा उत्तम वापर करतातच त्यांचे वाचन,भाषण, लेखन, रेकॉर्डिंग, हे सर्व कौशल्य सुधारलेले दिसून येतील सोबतच हे सोशल मिडिया, ब्लॉग ,वेबसाईट च्या माध्यमाने क्लाऊड स्टोरेज असल्यामुळे लाखो शिक्षक शाळांना याचा मोफत लाभ होतोय हि सर्वात महत्त्वाची उपयुक्तता आहे. हे वास्तव आहे.

Utility: The project enables students to learn not only LSRW skills, but also empower them to keep themselves in pace with the modern  techno-savvy world. They are well aware of the fact that they are sharing their knowledge with teacher and student community.

 

) नवोपक्रमाची उद्दिष्ट्ये :-

अ )  का ? :-  हा उपक्रम मी माझ्या विद्यार्थ्यात अभिव्यक्ती कौशल्य कमतरता जाणवल्याने राबवण्यास सुरुवात केली.

Objectives of the project:

To develop  the expression skills in students

अ)    प्रत्येक मुलात  वाचनाची आवडनिर्माण व्हावी.

To develop reading habits and love for books

आ)  वाचलेले आठवून सहजपणे सांगता यावे,अभिव्यक्त होता यावे.

To develop retention and retelling

इ)      वाचलेले ,सांगितलेले ,सहजपणे लिहिता यावे.

To impart stress-free education

ई)      वाचलेले,अभिव्यक्त झालेले,लिहिलेले उत्तमपणे रेकॉर्डिंग करून स्वता:ची एक झिरो बजेट लायब्ररी तयार व्हावी.

To expand the library for the students, of the students and by the students

उ)     झिरो बजेट लायब्ररी चा उपयोग लाखो शिक्षक शाळांना व्हावा.

To benefit lakhs of teachers.

) फायदा कोणाला ? :-  या उपक्रमाचा फायदा हा माझा वर्गातील,शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व सोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने राज्यभरातील लाखो शिक्षक व विद्यार्थ्यांना असणार आहे.

) कसा,कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे:- झिरो बजेट लायब्ररीहा असा उपक्रम आहे की आपल्याकडे उपलब्ध असणारी पुस्तके अथवा tab वरील मोफत पुस्तकांची app  नुसती वाचायची नाहीत तर वाचलेली पुस्तके सारांश रूपाने मुलांनी गोष्टी रुपात सांगितली पाहिजे, सांगितलेली लिहिता आली पाहिजे  व लिहलेली रेकॉर्डिंग करता आली पाहिजे म्हणजेच मुले उत्तम व मनोरंजक पद्धतीने वाचनात सहभाग घेवू लागतात,त्यानंतर त्याच्याबद्दल अभिव्यक्त होऊ लागतात, त्याच बाबी लेखणीतून वहीमध्ये उतरवायला शिकल्याने लेखन कौशल्य सुधारते,व त्यांना भविष्यात उत्तम वार्ताहर, निवेदक होता यावे यासाठी रेकॉर्डिंग ची सवय लागण्यास साह्य होते.व त्याचा स्वताची रेकॉर्डिंग केलेल्या गोष्टीची एक उत्तम अशी झिरो बजेट लायब्ररी  तयार होते .असा हा उपक्रम असल्याने रेकॉर्डिंग केलेली शेकडो गोष्टीरुपी पुस्तके आज वेबसाईट वा लिंक च्या सह्याने  राज्यभरातील लाखो शिक्षकांना लाभ मिळत आहे.

Details of the project:

The students use tabs which are donated by some philanthropists or NGOs. They read books on apps or tabs. Once the books are read, the students write down what they have learnt or their understanding. Further it is recoded in their voices. The recordings are made available to teachers and students across the state.

) काय व कोणासाठी :-  या उपक्रमातून मुलांचे बोलणे, वाचणे, लिखाण, उत्तम रेकॉर्डिंग कौशल्य सुधारणा होणार आहे ती फक्त एका शाळेतील नसून सर्व शाळेत सहज वापर होणारा उपक्रम आहे.

Who will be benefitted

The students of every students can participate in this project and they will be able to develop their language skills as well as oral and aural skills through recording.

४) नवोपक्रमाचे नियोजन :-

        I.            उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण :- सदरील उपक्रम राबवण्यापूर्वी मुले आनंदाने वाचण्यासाठी उत्सुक दिसत नव्हती,त्यामुळे सहाजिकच वाचलेली गोष्ट अभिव्यक्त करता येत नव्हती आणि मग रेकॉर्डिंग करून स्वतंत्र लायब्ररी किंवा साठवण करणे शक्य होत नव्हते.

Initially the students were not interested in reading., They did not have vocabulary to express themselves. It was a rote learning. Learning was not a fun so was not stress-free.

      II.            संबंधीत व्यक्तींशी,तज्ञांशी चर्चा :- या संदर्भाने मी माझ्या शाळेतील सहकारी,तसेच दर महिन्याच्या शिक्षण परिषेदेत सुद्धा यावर चर्चा घडवून आणली प्रत्येकाने वेगवेगळे उपाय सांगितले त्यावर मी सर्व एकत्रित करून हा एक अभिनव असा उपक्रम जुलै २०१७  पासून माझ्या शाळेत सुरु केला.

To make learning an enjoyable activity, I discussed it with like-minded people in teachers council. Many solutions were offered, I contemplated on them and came up with the innovative idea of ‘Zero Budget Library’.

    III.            आवश्यक साधनांचा विचार :- उपक्रमाचे नावच झिरो बजेट लायब्ररीअसल्याने यासाठी या अगोदरच शाळेत शासनाचे उपलब्ध करून दिलेल्या वाचनालयातील उपलब्ध पुस्तके आणि माझ्या शाळेत १०० टक्के विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारे tab हीच आवश्यक असणारी साधने आहेत. व रेकॉर्डिंग साठी तेच tab आम्ही उत्तमम पद्धतीने वापरतो म्हणजे आम्हाला कोणताही खर्च यासाठी करवा लागला नाही.सर्वांकडे असणारा मोबाईल चा हि वापर होवू शकतो आणि साठवण्यासाठी मोफत असणा-या गुगल ड्राईव चा वापर सहज कोणालाही करता येवू शकतो.

    IV.            The students have tabs. The same tabs are used for recording. It is called zero budget because we do not incur any amount of money to create this library. For storage students can use google drive.

      V.            करावयाच्या कृतीचा क्रम :- How is it implemented

अ)हा उपक्रम राबवताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पुस्तके अथवा tab हि साधने उपलब्ध करून देणे.

Students read hard copy of a book or they read book on their tab

आ)     त्यांच्याकडून एक गोष्ट वाचन करून घेणे.पाच मिनिटे डोळे मिटून त्याबद्दल स्मरण करण्यास सांगणे. त्यानंतर ती गोष्ट वर्गात सर्वांसमोर उभे राहून सांगणे.

इ)           Once the reading of a story is completed they are asked to close their eyes and asked to recall what they have read. It is followed by the student narrating the story in his words.

ई)         सांगितलेली गोष्ट त्यांच्या वहीत लिहण्यास सांगणे व आपण काळजीपूर्वक तपासून घेणे.

उ)          The students are made to write the same story in their notebooks. Which later is accessed by the concerned teacher.

ई) वाचलेली, सांगितलेली,लिहिलेली गोष्ट tab च्या साह्याने रेकॉर्डिंग करून घेणे.व शिक्षकांनी त्याचे योग्य जतन करणे.

The student records the same story in his voice.

    VI.            उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण :- उपक्रमोत्तर स्थिती ही अतिशय समाधान देणारी ठरते. कारण ज्या कारणासाठी हा उपक्रम सुरु केला होता त्यामध्ये १०० टक्के विद्यार्थी अगदी उत्साही प्रतिसाद देताना दिसतात.व १०० टक्के विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्ती सुद्धा यशस्वी झाल्याचे जाणवते.

  VII.            Observations: All students participated in the activity wholeheartedly. They were enthusiastic to be a part of the project and express themselves. The teaching learning goals were met through stress-free education.

VIII.            कार्यवाहीचे टप्पे :- जुलै २०१७  मध्ये आम्ही हा उपक्रम सुरु केला.व पर्यंतच्या नोंदी घेतल्या आहेत.

    IX.            We started the project in July 2017

अ)    दर आठवड्यात गुरुवारी हा उपक्रम आम्ही राबवतो.

Every Thursday the students read,write and record stories.

ब) महिन्यात एक वेळा समुहिक सर्वांच्या रेकॉर्डिंग ऐकवतो.

Once in a month the recording is listened by students.

क)      दर ४ महिन्याला प्रत्येकच्या किती गोष्टी वाचून झाल्या व किती रेकॉर्डिंग केल्या याची नोंद ठेवली जाते.

ख)       At the end of fourth month we keep record of how many stories are read and recorded.

      X.            उपक्रमासाठी इतरांची मदत :- माझ्या शाळेतील माझे मुख्याध्यापक श्री. भोज बाबा काळेल  यांचे सहकार्य असते.तसेच पालक आमच्या भेटीला या उपक्रमात येणारे पालक सुद्धा काही गोष्टी मुलांना सांगतात त्याचाही लाभ आम्हाला यासाठी होतो.

Our Principal and parents narrate stories to the students and the students record those stories also.

५) नवोपक्रमाची कार्यपद्धती :-How did I implement the innovative project

        I.            पूर्वपरिस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी :-   हा उपक्रम सुरु करण्यापूर्वी मुले धाडसाने अभिव्यक्त होत नव्हती आणि त्यामुळे tab समोर सहजपणे रेकॉर्डिंग करताना बोलू शकत नव्हती.

      II.            Observation and record keeping: Before the implementation of the project, the students could not express themselves. They were apprehensive.

    III.            कार्यवाही दरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन :- प्रत्यक्ष कार्यवाही करत असताना काही मुले दुर्लक्ष करायची मात्र इतर मुले छान गोष्ट सांगतात व रेकॉर्डिंग सुद्धा करतात हे पाहून त्यांच्यात हि सुधारणा झाली.काही मुले गोष्ट छान सांगायची मात्र लिहिताना अडचणी यायच्या मग त्यांना इतर मुलांचे नमुने दाखवले की हळूहळू सुधारणा झाली.तर काही रेकॉर्डिंग करताना मध्ये थांबायची सरावाने हे बंद झाले.

    IV.            Observations during implementation and data collection: Initially the enthusiastic students participated in the project but the some students neglected it. The first recordings of the stories were shared with these students to make them understand the efficacy of the program. Gradually all students showed their interest in the project. But there was one more problem. Many students could not make their writing coherent and cohesive. I shared with them the writing of their classmates and guided them so that they could improve their performance in recording as well as in writing.

      V.            उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व नोंदी उपक्रम पूर्ण झाल्यावर वाचनातील उत्साहीपण दिसून आला, न थांबता गोष्टी सांगणे, रेकॉर्डिंग करणे सहज होताना दिसत आहे.

    VI.            Success of the project: After completion of the project the changes observed are as follows:

                                                              i.      The student read stories voluntarily. They are all eager to read new stories.

                                                            ii.      The project has inculcated reading habits in students.

                                                          iii.      The students have developed reading skills.

                                                           iv.      The students narrate stories with confidence with the new set of vocabulary acquired through reading.

                                                             v.      The students do recording independently.

 

  VII.            कार्यवाहीत आलेल्या अडचणी :-  सर्वप्रथम इयत्ता १ लीच्या मुलांना वाचनात येणारी अडचण सोडवली व त्यानंतर अभिव्यक्त होण्यात बहुतांश अडचणी येत होत्या.मात्र त्यांना काही डेमो दाखवून हि समस्या सुटली.सर्वात मोठी अडचण होती tab समोर उभे राहून पूर्ण गोष्ट रेकॉर्डिंग करणे मात्र सुरुवातिला अर्धी अर्धी असे करत ती समस्या सुटत गेली.

Difficulties faced:

 The grade I students did not have the required set of vocabulary to express themselves, so they were taught by giving demos. Initially the student could not narrate the story in one go so they were encouraged to narrate and record only half part of the story. The teacher played key role in boosting their confidence.

 

VIII.            माहितीचे विश्लेषण :

    IX.            Analysis of data

 

 

  ६ ) उपक्रमाची यशस्विता /फलनिष्पत्ती :-

The success of the project

अ)    प्रत्येक मुलात आनंदाने  वाचनाची आवडनिर्माण झाली .

आ)    The students love reading.

इ)      वाचलेले आठवून सहजपणे सांगता येऊ लागले,सहजपणे अभिव्यक्त होता येऊ लागले .

ई)       Retention rate is improved. The students read, recall and record.

आ)  वाचलेले ,सांगितलेले ,सहजपणे लिहिता येऊ लागल्याने भविष्यातील लेखक निर्माण होऊ लागले.

इ)       The students are confident to pen their imagination. They are given a skill set at a tender age so that they can continue it in future to be successful writers.

ई)      वाचलेले,अभिव्यक्त झालेले,लिहिलेले उत्तमपणे रेकॉर्डिंग करता येऊ लागल्याने भविष्यात माझे विद्यार्थी उत्तम वार्ताहर, सर्वगुणसंपन्न निवेदक होण्याच्या मार्गावर आले आहेत.

उ)      The students in a remote, draught prone area can be a confident member of Gen Z. They can be future reporters and anchors.

ऊ)    वरील सर्व कार्यपद्धती तून प्रत्येक मुलाचे जवळपास १५ महिन्यात १०० गोष्टीची पुस्तके वाचून ५० -५० गोष्टींची रेकॉर्डिंग केलेल्या गोष्टींची  स्वता:ची एक झिरो बजेट लायब्ररी तयार झाली आहे.

ऋ)    In the last 15 months every student has read 100 stories and every student has his own zero budget audio library.

उ)     झिरो बजेट लायब्ररी चा उपयोग आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थांसोबत सोशल मीडिया ,ब्लॉग,वेबसाईट च्या माध्यमातून  लाखो शिक्षक शाळांना होताना दिसून येत आहे.

ऊ)    Our students have reached to lakhs of teachers and schools through social media, blogs and websites.

 

------------------------------------------------------------------------------------------------(कोविड काळात हाच उपक्रम ‘स्टोरी ऑन  फोन’ या नावाने वापरत आणला )

स्टोरी ऑन फोन

        कोविड १९ मुळे आमच्या शाळा बंद आहेत.आम्ही व आमची मुले एकमेकांना इच्छा असूनही दररोज भेटू शकत नाही.मग शिकणे व शिकवणे हे हि बंद पडण्याची शक्यता आहे नव्हे बहुतांश बंद पsडत आहे त्यात काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु केले मात्र आमच्या सारख्या सातारा जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांमध्ये कसे शिक्षण सुरु ठेवावे हा प्रश्न शिक्षक म्हणून माझ्या समोर आ वासून उभा राहिला ,मग प्रश्नातच उत्तर शोधण्याचा मार्ग मी शोधला. माझ्या पालाका कडे स्मार्ट फोन नाहीत मग laptop व संगणक खूप दूरची गोष्ट त्यात इंटरनेट ची वणवा जरी काही भागात आहे. आमचे सर्व  पालक  गरीब शेतकरी , एकर दोन एकर शेती आणि बहुतांश मजुरीवर जगणारे पालक मग त्यांनी ३०० ते ४०० रु चा इंटरनेट pack कसा परवडेल अशा अडचणीत काहीतरी मार्ग शोधणे आवश्यक होते आणि तो मार्ग सापडला स्टोरी ऑन फोन.

                माझ्या सर्व पालकांकडे मोबाईल फोन मात्र आहेत आता मी त्या फोन द्वारेच मुलांना शिक्षण देण्याचे ठरवले आणि पालकांना १५ एप्रिल पासून दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या  साध्या फोनवर व्हाईस कॉल करायचो व मुलांना याद्वारे अर्धा तास गप्पा मारायच्या आहेत असे पालकांना सांगितले व त्यातून मुलांचा अभ्यास घेईन अशी चर्चा फोनवरच मी करत होतो कारण बाजूचे गाव करोना पेशंट असल्याने contenment झोन मध्ये होते त्यामुळे तिकडे जाने शक्य नव्हते.पालकांना सुरुवातीला वाटले अशी कुठं शाळा असते का ? मात्र मी दररोज २ वेळा सकाळी ८ वाजता म्हणजे ते कामावर जाण्यापूर्वी व संध्या ७:३० ला कामावरून आल्यावर व मुले झोपण्यापूर्वी अशा दोन वेळा निवडून दररोज कॉन्फरन्स कॉल करू लागलो.एका वेळी १० पालकांना कॉन्फरन्स कॉल वर एकत्रित घेता येते ,त्यातच काही घरातील २ किंवा ३ मुले असल्यास जवळपास १५ मुलांना एकाच वेळी मी फोनवरून वर्ग घेऊ शकतो.जिओ चे ग्रुप व्हाईस कॉल नावाचे एक app आहे त्याद्वारे एका क्लिक वर जेवढे पालक जिओ धारक आहेत त्यांना कॉल करता येतो यामध्ये मर्यादा नाही.

                सुरुवातीचा आठवडा मुले मध्येच काहीतरी बोलायचे, पालक वेळेवर घरी नसायचे ,कधी नेटवर्क ची समस्या मात्र हळूहळू या गोष्टी जमून आल्या मग मुलांना शिकवणे आवश्यक होते. मी फोनवर सांगितल्याप्रमाणे मुले वही पेन घेऊन फोनचा स्पीकर ऑन करून बसू लागले व रेकॉर्डिंग पण सुरु करू लागले पहिल्या आठवड्यात या गोष्टी अडचणी आल्या मात्र मुले सहजपणे यामध्ये तरबेज झाली. मग मी दररोज सकाळी एक गोष्ट मग ती पुस्तकाशी संबधीत तर कधी कधी निव्वळ मनोरंजन देणारी असायची मात्र त्यातून बोध छान मिळायचा.मुले काळजीपूर्वक ऐकायला लागली.फोन झाल्यावर रेकॉर्डिंग केलेली पण ऐकायचे व फोन संपताच मी जे काही सांगितले ते आपल्या घरच्यांना जशाच्या तशे सांगायला लागले.मग घराचे सर्व पालक म्हणू लागले गुरुजी तुमची फोनवरची शाळा मुलांना गुंतवून  ठेवतीय बरं.यातून मुलांचं अभिव्यक्ती कौशल्य सुधारत होते.मग या गोष्टी कधी कधी पुस्तकातील पाठच्या हि मी सांगू लागलो आणि मुले एकूण जशाच्या तशा सांगू लागले.

                यानंतर १० दिवस आम्ही सकाळी मी गोष्ट सांगायचो संध्याकाळी मुले मला जशाच्या तश्या गोष्टी सांगू लागले म्हणजे मी श्रवण व भाषण,अभिव्यक्ती मध्ये यशस्वी झालो होतो.आता मला मुलांच्या लेखनाकडे वळायचे ठरवले व ऐकलेली ,सांगितलेली गोष्ट लिहता येईल का असे मी  एका दिवशी विचारले आणि मुले प्रयत्न करतो म्हणाले व काही मुलांनी त्या दिवशी छोटासा प्रत्यत्न केला.मग एकमेकांना वर्गात जसे ऐकतो तसे ऐकूण मुले गोष्टी लिहायला लागली व छान छान गोष्टी पाहून पालकांना आनंद होऊ लागला मग जूनमध्ये पुस्तके प्राप्त झाली आम्ही प्रत्येक विषय ठरवून पाठ गोष्टी सारखे शिकायला लागलो.सध्या दररोज एक विषय घेऊन त्याचा पाठ गोष्टी सारखा शिकवतो व मुले अगदी तसाच मला संध्याकाळी सांगतात त्यातून त्यांची आकलन क्षमता खूप छान सुधारली.सध्या सर्व विषयात मी याचा वापर सुरु केला आहे.  मुले सुद्धा आनंदाने सध्या व्हाईस कॉल द्वारे शिक्षण घेत आहेत.

                मग मी एवढ्यावरच थांबलो नाही तर माझ्या सोबत आमच्या आजूबाजूला असणा-या शाळेतील शिक्षकांना या प्रयोगाबद्दल सांगितले त्यातील काही शिक्षकांनी हा पर्योग त्यांच्या शाळेत सुरु करून यशस्वीपणे राबवत आहेत.आमच्या सातारा डायटच्या माध्यमाने या काळात विविध ऑनलाईन प्रशिक्षणात मी माझा हा प्रयोग मांडत गेलो तो सर्वांना इतका आवडला की सर्व जिल्ह्यात आज बहुतांश शिक्षक वापर करत आहेत.सोबतच लोकमत चे संपादक श्री. अतुल कुलकर्णी यांनी कोविड काळात ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवना-या शिक्षकावर वाह ! क्या बात है गुरुजी ! अशी एक स्टोरी बनवली आणि त्यात माझी स्टोरी ऑन फोनसंपूर्ण राज्यात पोहचून लाखो शिक्षक याबद्दल जाणून घेऊन याचा वापर करू लागले.सोबतच टोकियो जपान मधून, मेलबर्न आस्ट्रेलिया ,मुबई, रत्नागिरी अशा विविध ठिकाणाहून मला याबद्दल मेल आले व तिकडे राबवण्यास ते उत्सुक असल्याचे कळवले जात आहे.या १०० दिवसात मी स्वता देशभरात ५० पेक्षा जास्त वेबिणार मध्ये स्पीकर म्हणून आमंत्रित होतो त्यामुळे प्रत्येक वेबिणार मध्ये माझ्या विविध प्रयोगासोबत मी हा प्रयोग ,उपक्रम सांगितल्यास याला भरभरून प्रतिसाद मिळतोय कारण सर्व समस्यावर सहज करता येनायासारखा उपाय आहे. एकूणच लोकल टू ग्लोबलअसा प्रवास या उपक्रमाचा सुरु आहे.

                        एकूण आनंददायी असे शिक्षण,वाचन लेखन, अभिव्यक्ती कौशल्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होत आहे व सध्याच्या कोविड काळात होतोय हे महत्त्वाचे आहे. स्टोरी ऑन फोनमुळे आमचं आवश्यक तेवढं तरी शिक्षण उत्तमपणे सुरु आहे. बस्स इच्छा तिथे मार्ग याचा परिचय प्रत्यक्ष यामुळे झाला.

 

 

७) समारोप :- 

         एकूणच हा उपक्रम सुरु करताना येणा-या सर्व अडचणी सुटून माझ्या शाळेतील १ ली ते ४ थी च्या प्रत्येक विद्यार्थ्यात वाचनाची आवड निर्माण होवून मुले सहजपणे अभिव्यक्त होवू लागली व प्रत्येक शिक्षकाला वाचन लेखन,अभिव्यक्ती याबद्दल असणारी अस्वस्थ सहजपणे  नाहीसी झाली.यामुळे वाचलेले स्मरण करून समजून घेण्याची सवय लागल्याने स्पर्धा परीक्षेत सुद्धा याचा छान  उपयोग होवू लागला.मुले छान छान गोष्टी चे लेखन सुद्धा करू लागले.सर्व विषयात या उपक्रमाचा फायदा वाचन करून सहज आकलन करण्यास झाल्याने सर्व विषयाचे अध्ययन हे सहज व सुलभ होऊ लागले.जसे

       जे अवघड आहे ते सोपे करावे,

       जे सोपे आहे ते सहज करावे.

या उक्तीप्रमाणे माझ्या शाळेतील सर्व मुले उत्तम वाचक झाली, उत्तमपैकी लेखन करू लागली आहेत,अभिव्यक्त होवून छान पणे रेकॉर्डिंग करून स्वत:ची अशी झिरो बजेट लायब्ररी बनवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. एवढेच नसून माझ्या www.shiKShanbhakti.in  या वेबसाईट च्या माध्यमातून हजारो  शिक्षकांनी याचा उपयोग सुरु केलेला दिसून येत आहे.

                                      माझ्या शाळेतील प्रत्येक मुल या उपक्रमाने नुसते वाचन, लेखनच नव्हे तर उद्याचा सर्वोत्तम लेखक, वक्ता,निवेदक झालेला आपणा सर्वांसमोर लवकरच दिसून येईल. शेवटी कोविड काळात तर ‘स्टोरी ऑन फोन’ नावाने हा उपक्रम राज्यभर,देशभर व जगभरातून प्रतिक्रिया येऊन उपयुक्त ठरत आहे व आजही सुरु आहे.

व्हिडीओचीलिंक - https://youtu.be/DC2B_TFHOik

लोकमत ने बनवलेली स्टोरी https://youtu.be/AGxn7B0LpPU

 

 

       


विद्यार्थी गोष्टींची पुस्तके वाचताना.            

 tab वर गोष्टी वाचतानावाचलेल्या गोष्टी लेखन करताना 

वाचलेल्या गोष्टींचे tab द्वारे रेकॉर्डिंग करतानाविद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी.

          Saved all recorded story on Google DriveIIM अहमदाबाद यांनी देशातील निवडक उपक्रम त्यांच्या Twitter वरून शेअर केले त्यात आपला हा उपक्रम.जपान येथून आपल्या उपक्रमाला आलेली प्रतिक्रिया .हैदराबाद येथून आलेली प्रतिक्रिया

Symbiosis कॉलेज कडून आपल्या उपक्रमाबद्दल च्या प्रतिक्रिया .

बेंगळूरु येथून आलेली प्रतिक्रिया

IIMअहमदाबाद यांनी देशातील नाविन्यपूर्ण ५ प्रयोगांना निमंत्रित केले होते त्यामध्ये मी माझा उपक्रम सादर केला.

(लॉकडाऊन काळात देशातील २४ राज्यात हा उपक्रम वेबिनाराच्या माध्यमातून मी मांडला आहे व बहुतांश राज्यांनी त्यांच्या शाळेसाठी सुरु सुद्धा केला आहे.)

No comments: