Author of the week

आणि हो मी  "Author Of The Week"  चा  विजेता ठरलो. लेखनासाठीचा पहिलाच सन्मान ,आपल्यास सर्वांच्या अनमोल मताच्या पाठिंब्याने हे शक्य झालय. स्टोरी मिरर कडून मराठी भाषेतील लेखनासाठीचा हा सन्मान मला प्राप्त झाल्याचा मनस्वी आनंद  आपल्या सर्वांमुळे होतोय.पुनश्च आपल्या सर्वांचे मनापासून आभार .....


राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार


२०१८-१९ वर्षीच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार साठी निवड
व्हर्च्युल फिल्ड ट्रीप

व्हर्च्युल फिल्ड ट्रीप  : शिकण्यातला जिवंतपणा

लहानपणी माझी आई मला रामायण, महाभारतातील कथा सांगायची आणि म्हणायची की, राम अचानक आवतरले आणि भक्ताची मदत केली.मला ऐकून भारी वाटायचे,मात्र उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना मी शंका उपस्थित करायचो तर आई म्हणायची ते देव होते त्यांच्या कडे दैवी शक्ती होत्या त्यामुळे ते काहीही करू शकत आसत.मी म्हणायचो काहीही म्हणजे काय? त्यावर माझी आई उत्तर द्यायची की एखादा भक्त श्रीलंकेत अडचणीत आहे तर देव ताबडतोब तिथे जावून त्याला मदत करत,लगेच नेपाळ  मध्ये दुस-या भक्ताला. विज्ञान शिकताना मला माझी आई खोटी वाटायची......पण पुढे शिक्षकी पेशात आल्यावर शिक्षणात तंत्रज्ञान वापर सुरु केल्यावर समजू लागले की ते खरे की खोटे माहिती नाही मात्र तंत्रज्ञाना मुळे सध्या ते शक्य होतेय.आणि अगदी सहज शक्य.
                                              तसे पाहता शिकण्याचे विविध मार्ग,पद्धती आहेत त्यामध्ये तंत्रज्ञान वापरून कमी वेळेत,सहज ,मनोरंजक पद्धतीने काही गोष्टी शिकता येतात त्यापैकीच एक पध्दत म्हणजे व्हर्च्युल ट्रीप ज्याला आपण व्हिडीओ कॉन्फरन्स या नावाने आपण सहज परिचित होतो.काय असते हे,यातून कसे होते शिक्षण,याची गरज काय आणि प्रत्येकजण हे कसे करू शकतो  याबद्दल जाणून घेणे कोणालाही आवडेल.या पध्दतीत संगणक आणि इंटरनेट यांच्या मदतीने जगभरातील कुठल्याही व्यक्तीशी आपण समोरा समोर बोलतो याप्रमाणे सहज संवाद साधू शकतो.सर्व प्रथम मी २०१० साली आमच्या म्हसवड केंद्राच्या केंद्र संमेलनात यशदाचे संचालक निनीत खाडे (भा.प्र. से.)यांच्याशी आम्ही संवाद साधला होता तेंव्हा खूप नवल आणि अजब वाटले सर्वांना, मग पुढील काळात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिकण्यात याचा वापर करून विविध राज्यातील, विविध देशातील लोकांशी आमचे विद्यार्थी आज सहज संवाद साधतात.
गरज :
) पुस्तका सोबत जगभरातील ब-याच गोष्टी प्रात्यक्षिक पाहता याव्यात.
) त्या त्या भागातील सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक परिस्थिती माहित व्हावी.
) सहज व मनोरंजक  शिकण्याच्या विविध पध्दती समजण्यासाठी.
) देश विदेशातील मुलांच्या आवडी निवडी समजाव्या.
) त्या त्या देशातील,राज्यातील शिक्षण व्यवस्था प्रगल्भीकरण होण्यासाठीचे प्रयत्न माहित व्हावेत.
व्हर्च्युल ट्रीप कशी करावी ?
) विविध software वापरून आपण ही प्रक्रिया करू शकतो त्यातीलच एक म्हणजे स्काईप (Skype) नावाचे software किंवा अप्लिकेशन घ्यावे लागते.
) त्यावर आपले स्वता:चे खाते (Account) इमेल च्या साह्याने तयार करावे लागते.
) आपले स्वत:चे एक स्काईप नेम तयार होते फेसबुक प्रमाणे उदा.Balaji.jadhav83 हे माझे स्काईप नेम आहे.
) फेसबुक प्रमाणे आपण एकमेकांना रिक्वेस्ट पाठवावी लागते व ती स्वीकारावी लागते,त्यानंतर आपण एकमेकांचे स्काईप मित्र होतो.
) आपल्या संपर्क क्रमांकाहून ही आपण एकमेकांशी जोडले जावू शकतो.
) स्काईप हे इंटरनेट सुरु असल्यावरच काम करू शकते त्यामुळे स्काईप आणि इंटरनेट या दोन्ही बाबी सुरु कराव्यात.
) स्काईप सुरु केल्यावर आपल्याला आपले नाव दिसते त्याच्या खाली contact नावाचा पर्याय दिसतो आपण जेवढ्या मित्रांशी जोडलो गेलोत ते तेथे दिसतात.
) त्यांच्या नावावर क्लिक केले कि आपणास व्हिडीओ कॉल,व्हाईस कॉल,एस एम एस असे पर्याय दिसतात.त्यापैकी व्हिडीओ या पर्यायावर क्लिक केल्यास समोरच्या व्यक्तीला कॉल आलेला दिसतो त्याने कॉल घेतल्यास आपण एकमेकांना दिसू लागतो.
) ज्यांना आपल्या बोलायचे आहे त्यांच्याशी  प्रथम फोनवर चर्चा करून वेळ, विषय हे ठरवून घ्यावे लागतात.
१०) साधने म्हणाल तर laptop असल्यास हेडफोन शिवाय आवाज येवू शकतो मात्र संगणक असल्यास त्याला वेब कॅमेरा आणि हेडफोन असावे लागतात.
११) समोरचे व्यक्ती दिसल्यास आपण त्यांच्याशी  चर्चा करू शकतो जसे, भागाकार शिकवण्याची तुमची पध्दती कोणती? मग ते प्रत्यक्ष ती क्रिया तेथे करून  दाखवू शकतात म्हणजे हजारो किलोमीटर जावून शिकण्या ऐवजी प्रत्यक्ष तेथेच शिकायला मिळते.
१२)वरच्या बाजूला स्काईप ,contact ,conversation,call ,view,tools,help असे पर्याय दिसतात त्या सर्व पर्यायाचा वापर वेगवेगळ्या गोष्टी साठी आपण करू शकतो.
१३) सोबतच एका पेक्षा जास्त म्हणजे दोन,तीन ,चार व्यक्ती आपण एकत्रित प्रत्यक्ष संवाद साधू शकतो त्यासाठी एकाला बोलणे सुरु असताना आपल्या स्क्रीनवर एक बेरेजेचे चिन्ह दिसते त्यावर क्लिक करून दुस-या व्यक्तिंना जोडू शकतो.
१४) वरील पर्यायामध्ये खूप चांगले पर्याय आहेत जसे की call नावाच्या पर्यायात share screen नावाचा एक पर्याय आहे याने आपल्या संगणकाची पूर्ण स्क्रीन समोरील व्यक्तिंना दाखवता येते असे विविध पर्याय यामध्ये आहेत.
१५) प्रश्नोत्तरे, प्रात्याक्षिके, नाट्य,नकला,चित्रकला, पद्धती,सर्व बाबी प्रात्यक्षिक दाखवता व पाहता येतात.
१६) बोलणे संपल्यावर कॉल समाप्त करून संभाषण संपवून आपण लॉग आउट होवू शकतो.
फायदे/ परिणाम
) स्क्रीनवर प्रात्यक्षिक पहिल्याने शिकण्यात जिवंतपणा येतो.
) मुलांचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो.
) विविध भाषा,कला,वेशभूषा,सर्व बाबी सहज आणि अगदी कमी वेळेत समजायला मदत होते.
) जगभरात शिक्षणासाठी काय सुरु आहे,आपण कोठे आहोत याचीही माहिती होते.सोबत आपल्याला काय सुधारणा करायला हव्यात हे समजायला लागते.
) नियमित पद्धतीने शिकण्यापेक्षा या पद्धतीने कधीतरी शिकायला मिळते त्यामुळे स्मरणात राहण्यास मदत होते.
                                                शिकण्यात विविधता आल्याने चिरकाल स्मरणात राहते हे सत्य आहे आणि आवश्यक तेथे गरजेनुरूप या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न केल्यास त्यात जिवंतपणा आल्याशिवाय राहत नाही.शिवाय खूप खर्चिक आहे असेही नाही.ग्रामीण भागात नेटवर्क सारख्या समस्या आहेत त्यासाठी IMO सारखे 2g नेटवर्क मध्ये काम करणारे काही app आहेत त्याच्या मदती ने सुद्धा असे अनुभव घेता येवू शकतात.
                                                शेवटी काय तर तंत्रज्ञान वापरामुळे आपल्या शिकण्यात  काही भर पडत असेल,तीही इतकी सहज आणि परिणामकारक तर आपण सर्वांनी व्हर्च्युल ट्रीप चा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही आणि शिकण्यातला जिवंतपणा वाढवण्यास प्रयत्न करून आपलं प्रत्येक मुल सहज शिकण्यासाठी प्रयत्न करूया.
               जे आवघड असते ते सोपे करूया,
                                    जे सोपे आहे ते सहज करूया,
                                    जे सहज आहे ते सुंदर करूया,
                                    प्रत्येक मुल शिकण्यासाठी प्रयत्न करूया,
                                                            आणि,
                                    विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
                                    प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया.
बालाजी बाबुराव जाधव
जि..केंद्रशाळा विजयनगर  ता. माण जि.सातारा.
मोबाईल -७५८८६११०१५
वेबसाईट www.shikshanbhakti.in
Youtube Channel- shikshanbhkati
 

हस्तलिखित मराठी Agumented Reality Cardअक्षरे,शब्द व चित्रे झाली जिंवत .....                             व्हिडीओ  साठी येथे  क्लिक 
जि प शिक्षकाने बनवले मराठी स्वनिर्मित AR कार्ड ....
                                जगभरात विविध क्षेत्रात सत्यात्याने नवनवीन प्रयोग उदयास येत आहेत,नाविन्याचा ध्यास असणारी माणसे नवीन गोष्टींचा शोध कायमच लावण्यासाठी धडपडत असतात अशीच धडपड सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील विजयनगर शाळेतील गुगल इनोव्हेटर शिक्षक बालाजी जाधव यांनी केलेले  एक नाविन्यपूर्ण असं संशोधन आपल्या समोर येत आहे ते म्हणजे प्रथमच  मराठी भाषेत स्वनिर्मित AR कार्ड (Agumented Reality)  होय.
                                काय असतात AR कार्ड ? तर प्रामुख्याने गुगल प्ले स्टोअर वरून agumented Reality चे appडाऊनलोड करून घेवून त्यामध्ये दिलेले कार्ड अथवा फोटो आपण थ्रीडी स्वरूपात अनिमेशन च्या रूपाने पाहू शकतो ते काही मर्यादित चित्र असतात अथवा त्यांच्या वेब वरून पैसे देवून काही कार्ड आपण विकत घेवून वापरू शकतो मात्र त्यांनी बनवले तेवढेच वापरता येतात आणि तेही सर्व इंग्रजी भाषेतील अथवा इतर भाषेतील मर्यादित  असतात.आपणास हवा आहे तो शब्द अथवा चित्र अनिमेटेड थ्रीडी होवू शकत नाही हि त्या दुस-यांनी बनवलेल्या app ची मर्यादा आहे मात्र बालाजी जाधव या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने इतरांनी बनवलेले कार्ड वापरण्यावर समाधानी न राहता आपल्या मराठी भाषेतील कोणतही शब्द, चित्र, अक्षर agumented रूपाने मोबाईल च्या स्क्रीन वर दिसू शकेल अशी किमया केली आहे.आणि अशी किमया मराठी भाषेतील स्वनिर्मित कार्ड बनवण्याची हि पहिलीच वेळ आहे आहे आणि ते सुद्धा स्वनिर्मित एखाद्या जि प शाळेच्या ग्रामीण  भागतील शिक्षकाने बनवलेले.
                                नक्की काय आहेत हे कार्ड ,उदा तुम्ही हत्ती असा शब्द एका कागदावर लिहिला आणि त्याला स्कॅन केले तर त्यातून काहीच प्ले होताना दिसत नाही मात्र बालाजी जाधव यांनी असेच कार्ड बनवले की सामन्य कार्ड शीटवर कोणताही शब्द लिहिला जसे हत्ती आणि तो स्कॅन केला की जिवंत हत्ती त्या कार्डावर हालचाली करताना त्याच्या अवजासह आपणास दिसून येतील,एखादं चित्र स्कॅन करून ते जिवंत करणे एवढेच नसून नुसते कार्ड शीटवर लिहलेला शब्द चक्क जिवंत होतोय! आहे ना आश्चर्य ! सध्या प्ले स्टोर वरील उपलब्ध app मध्ये चित्र स्कॅन करून ते जिवंत केले जातात मात्र ते हि त्यांनी त्यात दिलेले जेवढी चित्रे असतील तेवढीच जिवंत होणार ,इथे मात्र हाताने लिहलेले शब्द आहेत आणि ते नुसते स्कॅन केले की ते जिवंत होतेय,मग ते प्राणी असतील ,पक्षी, वनस्पती, मुळाक्षरे, शब्द, कोणतेही चित्र असो हे सर्व सध्या कार्ड शीटवर लिहलेले आहे आणि स्कॅन करताच त्यात जिवंतपणा येतो हे स्वनिर्मित मराठी भाषेसाठी झाले आहे हि अगदी नाविन्यपूर्ण निर्मिती आहे. एवढेच नसून तुम्ही लढाई अशा शब्दावर स्कॅन केले की लढाईचा व्हिडिओ सुरु होतो. आगदी पुस्तकातील कोणतेही चित्र असू द्या उदा वनस्पती आहे ती स्कॅन केली की ती जिवंत होतेय, एखादी नदी आहे स्कॅन केली की ती खळखळून वाहायला लागते, धावणारा मुलगा असे चित्र असले आणि ते स्कॅन केले की तो चित्रातील मुलगा तुम्हाला धावताना दिसणार आहे,विमान असा शब्द असू द्या अथवा चित्र असू द्या ते स्कॅन केले की विमान हवेत उडताना दिसेल. इंग्रजीतील कृती असू द्या जसे Run असा शब्द स्कॅन केला की मुलगा धावताना दिसेल ,विज्ञान विषयातील एखादा प्रयोग आहे त्याच्या नावावर स्कॅन केले की तो प्रयोग दिसतो, कार्यानुभव या विषयात कागदाची होडी असा शब्द अथवा चित्र दिसले आणि ते स्कॅन केले की पाण्यास पोहणारी होडी दिसते ,नक्कीच जादुई वाटतय मात्र हि नवनिर्मिती आहे, त्रिकोण शब्दावरस्कॅन केले के त्रिकोण कसा रेखाटला जातो हे प्रत्यक्ष दिसते,असे किती आणि काय काय होवू शकते हे अगदी शक्य केले आहे एका सामान्य शिक्षकाने , म्हणजेच एखाद्या कंपनीने बनवलेले मर्यादित  कार्ड न वापरता आपणास हवे आहेत ते अक्षरे, शब्द, चित्रे हे सर्व agumented करण्याची किमया बालाजी जाधव या शिक्षकाने करून आपल्या अध्यापनात जिवंतपणा आणला आहे.
                        क्यू आर कोड स्कॅन केल्यावर एका विशिष्ट वेब अथवा लिंक वर घेवून् जाते किंवा इतर पर्याय क्लिक करावे लागतात मात्र यामध्ये नुसता मोबाईल त्यावर स्कॅन केला की सर्व agumented म्हणजेच थ्री डी अनिमेशन आवाजासह सुरु होताना दिसते म्हणजेच क्यू आर कोड च्या कितीतरी पटींनी हे नाविन्यपूर्ण असून अगदी सहज वापरण्यात येत आहे. म्हणजे आत्तापर्यंत ह्या सर्व निर्जीव चित्रे पाहून आपण अध्ययन अध्यापन प्रक्रिया करायचो मात्र आता हि प्रक्रिया जिवंत होताना दिसतीय.
                                शाळेतील अध्यापनात भाषा, गणित, इंग्रजी या विषयाकरिता खास करून याचा खूप उत्तम उपयोग होतोय, अभ्यासक्रमातील कठीण संकल्पना चित्रे, शब्द जिवंत होत असल्याने सहज समजण्यास मदत होत आहे. असे विविध कार्ड बनवून वर्गात विविध कोप-यात चिटकवून मुले tab अथवा मोबाईल च्या साह्याने स्कॅन करून अगदी काही सेकंदात कोणत्याही निर्जीव चित्राला, शब्दाला जिवंत करण्याची किमया मुलांना मिळवून देण्यासाठी बालाजी जाधव सारख्या शिक्षकांनी अहोरात्र प्रयत्नातून मराठी भाषेतील स्वनिर्मित कार्ड तयार करून शिक्षणव्यवस्थेला एका क्रांतीकारी टप्प्यावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहत आहेत.  
                                 या स्वनिर्मित कार्डमुळे मराठी भाषेतील शब्द,चित्र जिवंत झाली याचा मनोमन आनंद तर आहेच  सोबत मुलाच्या शिकण्यात खूप मोठ्या प्रमाणात मनोरंजकता वाढल्याचे दिसून येत आहे, शिकण्याचा वेग यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय, सहजता असल्याने कोणीही याचा वापर करू शकतात,तसेच कठीण संकल्पना शोधण्यास खूप सारा वेळ जायचा आता मात्र फक्त तो शब्द स्कॅन केला की तो शब्द जिवंत होतोय त्याचा व्हिडिओ प्ले होतोय अथवा थ्रीडी स्वरुपात agumented मध्ये चालू होतोय त्यामुळे खूप सारा वेळ सुद्धा वाचतोय .मराठीत असे  स्वनिर्मित कार्ड बनवणे व त्याचा वापर करणे हे खरोखर अभिमानास्पद यासाठी आहे की सध्या सोशल मिडिया आणि विविध माध्यमात इतरांनी बनवलेल्या app मधील मर्यादित साधनावर आमचे बरेच शिक्षक समाधानी होवून शेअर करताना दिसत आहेत मात्र मला कायमच वापरकर्ता न होता निर्माता व्हावेअसे वाटायचे आणि त्यामुळे मी असे शब्द आपणास मराठीत बनवत येतील का आणि तेही कोणताही मराठी शब्द स्कॅन केला की तो जिवंत होवू शकतो हे बनवू शकलो आणि ज्यामुळे शिकणे व शिकवण्यात जिवंतपणा येतोय हि बाब खूप आनंददायी आहे.व्हिडीओ व अधिक माहितीसाठी www.shikshanbhakti.in
Balaji Jadhav Asst. Teacher,
ZP school Vijaynagar Tq- Man Dist- Satara
Crcmhaswadno3@gmail.com
7588611015