हस्तलिखित मराठी Agumented Reality Cardअक्षरे,शब्द व चित्रे झाली जिंवत .....                             व्हिडीओ  साठी येथे  क्लिक 
जि प शिक्षकाने बनवले मराठी स्वनिर्मित AR कार्ड ....
                                जगभरात विविध क्षेत्रात सत्यात्याने नवनवीन प्रयोग उदयास येत आहेत,नाविन्याचा ध्यास असणारी माणसे नवीन गोष्टींचा शोध कायमच लावण्यासाठी धडपडत असतात अशीच धडपड सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील विजयनगर शाळेतील गुगल इनोव्हेटर शिक्षक बालाजी जाधव यांनी केलेले  एक नाविन्यपूर्ण असं संशोधन आपल्या समोर येत आहे ते म्हणजे प्रथमच  मराठी भाषेत स्वनिर्मित AR कार्ड (Agumented Reality)  होय.
                                काय असतात AR कार्ड ? तर प्रामुख्याने गुगल प्ले स्टोअर वरून agumented Reality चे appडाऊनलोड करून घेवून त्यामध्ये दिलेले कार्ड अथवा फोटो आपण थ्रीडी स्वरूपात अनिमेशन च्या रूपाने पाहू शकतो ते काही मर्यादित चित्र असतात अथवा त्यांच्या वेब वरून पैसे देवून काही कार्ड आपण विकत घेवून वापरू शकतो मात्र त्यांनी बनवले तेवढेच वापरता येतात आणि तेही सर्व इंग्रजी भाषेतील अथवा इतर भाषेतील मर्यादित  असतात.आपणास हवा आहे तो शब्द अथवा चित्र अनिमेटेड थ्रीडी होवू शकत नाही हि त्या दुस-यांनी बनवलेल्या app ची मर्यादा आहे मात्र बालाजी जाधव या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने इतरांनी बनवलेले कार्ड वापरण्यावर समाधानी न राहता आपल्या मराठी भाषेतील कोणतही शब्द, चित्र, अक्षर agumented रूपाने मोबाईल च्या स्क्रीन वर दिसू शकेल अशी किमया केली आहे.आणि अशी किमया मराठी भाषेतील स्वनिर्मित कार्ड बनवण्याची हि पहिलीच वेळ आहे आहे आणि ते सुद्धा स्वनिर्मित एखाद्या जि प शाळेच्या ग्रामीण  भागतील शिक्षकाने बनवलेले.
                                नक्की काय आहेत हे कार्ड ,उदा तुम्ही हत्ती असा शब्द एका कागदावर लिहिला आणि त्याला स्कॅन केले तर त्यातून काहीच प्ले होताना दिसत नाही मात्र बालाजी जाधव यांनी असेच कार्ड बनवले की सामन्य कार्ड शीटवर कोणताही शब्द लिहिला जसे हत्ती आणि तो स्कॅन केला की जिवंत हत्ती त्या कार्डावर हालचाली करताना त्याच्या अवजासह आपणास दिसून येतील,एखादं चित्र स्कॅन करून ते जिवंत करणे एवढेच नसून नुसते कार्ड शीटवर लिहलेला शब्द चक्क जिवंत होतोय! आहे ना आश्चर्य ! सध्या प्ले स्टोर वरील उपलब्ध app मध्ये चित्र स्कॅन करून ते जिवंत केले जातात मात्र ते हि त्यांनी त्यात दिलेले जेवढी चित्रे असतील तेवढीच जिवंत होणार ,इथे मात्र हाताने लिहलेले शब्द आहेत आणि ते नुसते स्कॅन केले की ते जिवंत होतेय,मग ते प्राणी असतील ,पक्षी, वनस्पती, मुळाक्षरे, शब्द, कोणतेही चित्र असो हे सर्व सध्या कार्ड शीटवर लिहलेले आहे आणि स्कॅन करताच त्यात जिवंतपणा येतो हे स्वनिर्मित मराठी भाषेसाठी झाले आहे हि अगदी नाविन्यपूर्ण निर्मिती आहे. एवढेच नसून तुम्ही लढाई अशा शब्दावर स्कॅन केले की लढाईचा व्हिडिओ सुरु होतो. आगदी पुस्तकातील कोणतेही चित्र असू द्या उदा वनस्पती आहे ती स्कॅन केली की ती जिवंत होतेय, एखादी नदी आहे स्कॅन केली की ती खळखळून वाहायला लागते, धावणारा मुलगा असे चित्र असले आणि ते स्कॅन केले की तो चित्रातील मुलगा तुम्हाला धावताना दिसणार आहे,विमान असा शब्द असू द्या अथवा चित्र असू द्या ते स्कॅन केले की विमान हवेत उडताना दिसेल. इंग्रजीतील कृती असू द्या जसे Run असा शब्द स्कॅन केला की मुलगा धावताना दिसेल ,विज्ञान विषयातील एखादा प्रयोग आहे त्याच्या नावावर स्कॅन केले की तो प्रयोग दिसतो, कार्यानुभव या विषयात कागदाची होडी असा शब्द अथवा चित्र दिसले आणि ते स्कॅन केले की पाण्यास पोहणारी होडी दिसते ,नक्कीच जादुई वाटतय मात्र हि नवनिर्मिती आहे, त्रिकोण शब्दावरस्कॅन केले के त्रिकोण कसा रेखाटला जातो हे प्रत्यक्ष दिसते,असे किती आणि काय काय होवू शकते हे अगदी शक्य केले आहे एका सामान्य शिक्षकाने , म्हणजेच एखाद्या कंपनीने बनवलेले मर्यादित  कार्ड न वापरता आपणास हवे आहेत ते अक्षरे, शब्द, चित्रे हे सर्व agumented करण्याची किमया बालाजी जाधव या शिक्षकाने करून आपल्या अध्यापनात जिवंतपणा आणला आहे.
                        क्यू आर कोड स्कॅन केल्यावर एका विशिष्ट वेब अथवा लिंक वर घेवून् जाते किंवा इतर पर्याय क्लिक करावे लागतात मात्र यामध्ये नुसता मोबाईल त्यावर स्कॅन केला की सर्व agumented म्हणजेच थ्री डी अनिमेशन आवाजासह सुरु होताना दिसते म्हणजेच क्यू आर कोड च्या कितीतरी पटींनी हे नाविन्यपूर्ण असून अगदी सहज वापरण्यात येत आहे. म्हणजे आत्तापर्यंत ह्या सर्व निर्जीव चित्रे पाहून आपण अध्ययन अध्यापन प्रक्रिया करायचो मात्र आता हि प्रक्रिया जिवंत होताना दिसतीय.
                                शाळेतील अध्यापनात भाषा, गणित, इंग्रजी या विषयाकरिता खास करून याचा खूप उत्तम उपयोग होतोय, अभ्यासक्रमातील कठीण संकल्पना चित्रे, शब्द जिवंत होत असल्याने सहज समजण्यास मदत होत आहे. असे विविध कार्ड बनवून वर्गात विविध कोप-यात चिटकवून मुले tab अथवा मोबाईल च्या साह्याने स्कॅन करून अगदी काही सेकंदात कोणत्याही निर्जीव चित्राला, शब्दाला जिवंत करण्याची किमया मुलांना मिळवून देण्यासाठी बालाजी जाधव सारख्या शिक्षकांनी अहोरात्र प्रयत्नातून मराठी भाषेतील स्वनिर्मित कार्ड तयार करून शिक्षणव्यवस्थेला एका क्रांतीकारी टप्प्यावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहत आहेत.  
                                 या स्वनिर्मित कार्डमुळे मराठी भाषेतील शब्द,चित्र जिवंत झाली याचा मनोमन आनंद तर आहेच  सोबत मुलाच्या शिकण्यात खूप मोठ्या प्रमाणात मनोरंजकता वाढल्याचे दिसून येत आहे, शिकण्याचा वेग यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय, सहजता असल्याने कोणीही याचा वापर करू शकतात,तसेच कठीण संकल्पना शोधण्यास खूप सारा वेळ जायचा आता मात्र फक्त तो शब्द स्कॅन केला की तो शब्द जिवंत होतोय त्याचा व्हिडिओ प्ले होतोय अथवा थ्रीडी स्वरुपात agumented मध्ये चालू होतोय त्यामुळे खूप सारा वेळ सुद्धा वाचतोय .मराठीत असे  स्वनिर्मित कार्ड बनवणे व त्याचा वापर करणे हे खरोखर अभिमानास्पद यासाठी आहे की सध्या सोशल मिडिया आणि विविध माध्यमात इतरांनी बनवलेल्या app मधील मर्यादित साधनावर आमचे बरेच शिक्षक समाधानी होवून शेअर करताना दिसत आहेत मात्र मला कायमच वापरकर्ता न होता निर्माता व्हावेअसे वाटायचे आणि त्यामुळे मी असे शब्द आपणास मराठीत बनवत येतील का आणि तेही कोणताही मराठी शब्द स्कॅन केला की तो जिवंत होवू शकतो हे बनवू शकलो आणि ज्यामुळे शिकणे व शिकवण्यात जिवंतपणा येतोय हि बाब खूप आनंददायी आहे.व्हिडीओ व अधिक माहितीसाठी www.shikshanbhakti.in
Balaji Jadhav Asst. Teacher,
ZP school Vijaynagar Tq- Man Dist- Satara
Crcmhaswadno3@gmail.com
7588611015